mla prashant bamb
sakal
कायगाव - संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळवताना जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला (T.C.) सादर करण्याची अट अनेक गरजू लाभार्थ्यांसाठी अडचणीची ठरत होती. ही अट शिथिल करून पात्र लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी शासनाकडे लेखी पत्राद्वारे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने शासनाने 14 ऑक्टोबर 2026 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.