Success Story: सालगडीचा मुलगा झाला सीए; वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण!
CA Result 2025: वसमत येथील सालगडी कुटुंबातील अंकुश तळेकरने आर्थिक संकटांवर मात करत अखेर सीए परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच्या आईच्या मोलमजुरीतून आणि स्वतःच्या चिकाटीने त्याने हे यश संपादन केले.
वसमत : वसमत येथील सालगडी कुटुंबातील मुलगा सीए परीक्षा उत्तीर्ण झाला याबद्दल आमदार राजू नवघरे यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते लक्ष्मीकांत नवघरे यांनी त्याचा शासकीय विश्रामगृह येथे सत्कार केला.