esakal | Success Story: महिलेने स्वकर्तृत्वाने फुलवलेल्या द्राक्ष बागेचे यशस्वी तिसरे वर्ष

बोलून बातमी शोधा

file photo}

मागील चार वर्षांपूर्वी आपल्या एक एकर शेतावर मिना पाठक यांनी आपल्या भावाच्या मार्गदर्शनाखाली साधी सोनाका या द्राक्ष वानाची सुमारे दोन हाजार दोनशे वेली पाच बाय सहा फुटावर लागवड केली.

Success Story: महिलेने स्वकर्तृत्वाने फुलवलेल्या द्राक्ष बागेचे यशस्वी तिसरे वर्ष
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : औंढा नागनाथ येथील मिना पाठक या महिलेने स्वकर्तृत्वाने आपल्या एक एकर शेतावर द्राक्षाची बाग फुलवली असून आता द्राक्षाचा तिसरा हंगाम बाजारपेठेत यायला तयार आहे. यातून चांगल्या उत्पन्नाची आशा त्यांनी व्यक्त केली. दुसऱ्या शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा असेच काम आहे.

मागील चार वर्षांपूर्वी आपल्या एक एकर शेतावर मिना पाठक यांनी आपल्या भावाच्या मार्गदर्शनाखाली साधी सोनाका या द्राक्ष वानाची सुमारे दोन हाजार दोनशे वेली पाच बाय सहा फुटावर लागवड केली. त्यानंतर बांबू, लोखंडी खांब रोवून त्यावर ताराची जाळी तयार करुन त्यावर या वेली सोडण्यात आल्या. यासाठी मोठा खर्च आला होता. आतापर्यंत तीनशेच्यावर या वेलीची फवारणी करण्यात आली आहे. 

त्यांचा मुलगा सोमेश पाठक हा आईची मोठी मदत करु लागतो

जिल्ह्यातील द्राक्षाची ही पहिलीच बाग असून तीही एका महिलेने फुलविल्याने व त्या स्वतः कटरने घड तोडण्यापासून ते कॅरेट लावून माल लावण्यापर्यंत स्वतः काम करत असतात यात त्यांचा मुलगा सोमेश पाठक हा आईची मोठी मदत करु लागतो. त्यांचा आदर्श घ्यावा अशीच आहे. मागील वर्षी कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनने माल घेण्यास व्यापारी तयार नसल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले होते. तर यावर्षीही जवळपास सध्या स्थिती त्याच उंबरठ्यावर असल्याने शेतकरी सध्या चिंतेत आहेत.

बाग पाहण्यासाठी अनेक शेतकरी जिल्ह्यासह पर जिल्ह्यातून येतात

दरम्यान ही बाग पाहण्यासाठी अनेक शेतकरी जिल्ह्यासह पर जिल्ह्यातून येतात. आता ही रोपे चार वर्षाची झाली असून साधारण दोन वर्षापासून द्राक्ष घेण्यास सुरुवात करण्यात येते. मागील दोन वर्षांपूर्वी वेली लहान असताना सुद्धा तीन लाख रुपयांच्या आसपास द्राक्षांची विक्री झाली होती. या वर्षी वेली मोठ्या झाल्या आणि द्राक्षाच्या गडही मोठ्या प्रमाणात लागली. परंतु सध्या वाढत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे पुन्हा काय होते. या भीतीमुळे त्यांनी घड तोडणी व विक्रीस सुरुवात केली आहे. सध्या भावात मंदी असल्याने व वाढत असलेल्या उन्हामुळे द्राक्षांचे मणी करपून जात आहेत.  थोड्या प्रमाणात नुसकान ही सहन करावे लागत असल्याचे शेतकरी मिना पाठक यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे