यंदा साखरेचा उतारा 9.87 टक्‍के 

तानाजी जाधवर - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

उस्मानाबाद - फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. हा हंगाम कसाबसा दोनच महिने चालला असून, आतापर्यंतचे नीचांकी गाळप व उत्पादन यंदा झाल्याचे दिसून येत आहे. नांदेड विभागात तर यंदा दहा लाख 63 हजार 957 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, त्यापासून दहा लाख 49 हजार 605 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या वेळी 9.87 टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे. 

मागील वर्षी 57 लाख 39 हजार 935 मेट्रिक टन इतके उसाचे गाळप झाले होते, तर 59 लाख 46 हजार 409 क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झाले होते. त्या वेळी 10.36 इतका साखर उतारा मिळाला होता. 

मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या पाच जिल्ह्यांसाठी नांदेड येथे साखर सहसंचालक कार्यालय आहे. या कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी (ता. 10) साखर हंगाम संपल्याची घोषणा करण्यात आली. उसाचे क्षेत्र यंदा कमी होते, त्यामुळे साखर उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. 

गेल्या तीन-चार वर्षांतील दुष्काळी स्थितीमुळे उसाचे क्षेत्र घटल्याने त्याचा थेट परिणाम मराठवाड्यातील साखर उद्योगावर झाला आहे. या परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा उसाच्या पिकाकडे वळण्याची चिन्हे कमी असल्याचे दिसून येत आहे. कोट्यवधींची उलाढाल यावर्षी कमी झाल्याने ग्रामीण अर्थकारणावरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. दोन वर्षांपूर्वी मराठवाड्यात 46 कारखाने सुरू होते, त्यापैकी गेल्या वर्षी फक्त 26 सुरू राहिले, यंदा तर त्यामध्ये निम्म्याहून कमी होऊन ही संख्या 11 वर आली. उस्मानाबाद जिल्ह्यात मागील वर्षी सहा कारखाने सुरू होते यंदा दोन, लातूरला चार कारखाने सुरू होते, यंदा एकच कारखाना सुरू होता, यामुळे साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे.

Web Title: Sugar 9.87 percent this year

टॅग्स