Sugar Production in Nanded : नांदेड विभागात ९८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप, ९५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन, कारखान्यांचे बॉयलर झाले बंद

Sugar Factories in Nanded : नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांनी ९८.७४ लाख टन ऊसाचे गाळप करून ९५.४६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून उत्पादनात १०% पेक्षा अधिक वाढ झाली आहे.
Sugar Production
Nanded Sugar Mills Reportesakal
Updated on

नांदेड : नांदेड विभागातील लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड या चार जिल्ह्यांतील २९ साखर कारखाने या हंगामात सुरू होते. सदर कारखान्यांनी हंगाम संपण्याच्या अखेर ९८ लाख ७४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्यातून ९५ लाख ४६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यावर्षी विभागात साखर उत्पादनात दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com