

Belgav Farmer Suffers Rs 4.5 Lakh Loss as Sugarcane Field Catches Fire Due to Electrical Distribution Panel Short Circuit
esakal
चाकूर: बेलगाव (ता. चाकूर ) येथे वीज वितरण यंत्रणेतील बिघाडामुळे शेतातील ऊसपिकाला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना रविवारी (ता. २५) दुपारी घडली. डीपीजवळ झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अशोकराव वाकळे पाटील यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला. या आगीत शेतकऱ्याचे सुमारे चार लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, किशनराव वाकळे पाटील यांच्या शेतातील उसाचेही नुकसान झाले आहे.