Sugarcane Season : ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात; ‘समृद्धी’ आज तर ‘समर्थ’, ‘सागर’ लवकरच होणार बंद
Sugar Mills : घनसावंगीतील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून समृद्धी साखर कारखाना १३ मार्च रोजी बंद होणार आहे. समर्थ आणि सागर कारखानेही लवकरच गाळप बंद करणार आहेत.
घनसावंगी : तालुक्यातील तीन साखर कारखान्यांपैकी समृद्धी साखर कारखाना गुरुवारी (ता. १३) गाळप बंद करणार आहे, तर गूळ पावडर कारखाना बंद करण्यात आला आहे. तसेच समर्थ व सागर या दोन्ही कारखान्यांचा उर्वरित गाळप हंगाम आठवडाभरात संपविणार आहे.