farmer agitation
sakal
कायगाव - पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३९०० रुपये पहिली उचल जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी ऊस उत्पादक संघर्ष समिती, गंगापूर समन्वय समितीच्या वतीने जुने कायगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.१६)दुपारी दोन वाजेपासून बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहास सुरुवात करण्यात आली आहे.
प्रशासनाने दोन दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.