esakal | हिंगोली जिल्ह्यातील जवळा पांचाळ परिसरात प्रेमीयुगलाची आत्महत्या

बोलून बातमी शोधा

file photo

घटना शुक्रवारी ता. नऊ सकाळी घडली असुन ते प्रेमीयुगल असल्याची चर्चा परिसरात होत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जवळा पांचाळ परिसरात प्रेमीयुगलाची आत्महत्या
sakal_logo
By
मुजाहेद सिद्दीकी

वारंगा फाटा ( जिल्हा हिंगोली ) : कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील शेतात एका युवक व युवतीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ता. नऊ सकाळी घडली असुन ते प्रेमीयुगल असल्याची चर्चा परिसरात होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जवळा पांचाळ परिसरात गुंडलवाडी येथील युवक व युवतीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजतच्या सुमारास घडली. अजय केशव डुकरे (वय १८) राहणार गुंडलवाडी व सरस्वती देविदास कऱ्हाळे (वय १५) राहणार राजदरी तालुका औंढा (ह. मु. गुंडलवाडी ता. कळमनुरी) या दोघांनीही जवळा पांचाळ शिवारातील गट नंबर १५१ मधील आंब्याच्या झाडाच्या एकाच फांदीस एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. 

हेही वाचा - हिंगोली : तीन कोटीच्या निधीतून २२ नवीन अंगणवाड्याचे बांधकाम होणार- डेप्युटी सीईओ गणेश वाघ

घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूरचे  फौजदार अच्युत मुपडे, जमादार शेख बाबर, भगवान वडकिल्ले त्यांनी घटनास्थळी जाऊन पुढील कारवाई करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रामेश्वर तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही युवक व युवती एकाच वेळी आत्महत्या केल्याने गावकरी हळहळ व्यक्त करीत आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत. हे युवक व युवती प्रेमीयुगल असल्याची चर्चा सोशलमीडीयावर व गाव तसेच परिसरात सुरु आहे. 

दरम्यान, अजय हा परभणी येथे बारावीत शिकत होता. काँलेज बंद असल्याने तो काही दिवसापासून गावातच होता. तर सरस्वती हिचे वडील गावात सालगडी म्हणून काम करतात तीचा नुकताच विवाह ठरला होता. ते त्यांच्या मुळ गावी लग्नाच्या तयारीत होते त्यातच ही घटना घडली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे