

Sudden Storm in Sukhapuri: Heavy Rain and Lightning Strike the Region
Sakal
अशोक चांगले
सुखापुरी : सुखापुरी परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली. जवळपास २० मिनिटे मुसळधार पाऊस कोसळत होता. या पावसासोबतच वादळी वारे आणि विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणावर झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.