Sunil Tatkare : झेडपीवर सत्ता आणा, मंत्री पद देतो-सुनील तटकरे यांचे हिंगोलीकरांना आवाहन; आमदार नवघरे यांना पुन्हा मंत्रीपदाचे आश्वासन
Hingoli Politics : हिंगोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आणल्यास वसमतला मंत्रीपद मिळेल, असा शब्द प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी कार्यकर्त्यांना दिला.
वसमत : हिंगोली जिल्हा परिषदेवर राष्टवादीची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुट होऊन कामाला लागावे,किमान विस सदस्य आपल्या पक्षाचे निवडुण आले तर वसमतला मंत्रीपद दिले जाईल असे अश्वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी दिले.