Republic Day 2024 : अविनाश साबळेंमुळे बीड जिल्ह्याला पुन्हा बहुमान ; प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिविशिष्ट सेवापदक जाहीर

‘अडथळ्यांची शर्यत’ या खेळ प्रकारात अनेक पदके पटकावून जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार नेणाऱ्या अविनाश साबळेंमुळे जिल्ह्याचा बहुमान पुन्हा एकदा वाढला आहे. भारतीय सैन्यदलात असलेल्या सुभेदार साबळेंना प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिविशिष्ट सेवापदक जाहीर झाले आहे.
beed
beedskal

बीड : ‘अडथळ्यांची शर्यत’ या खेळ प्रकारात अनेक पदके पटकावून जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार नेणाऱ्या अविनाश साबळेंमुळे जिल्ह्याचा बहुमान पुन्हा एकदा वाढला आहे. भारतीय सैन्यदलात असलेल्या सुभेदार साबळेंना प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिविशिष्ट सेवापदक जाहीर झाले आहे. आष्टी तालुक्यातील मांडावा या छोट्या गावातील वैशाली व मुकुंद साबळे या शेतकरी दांपत्याचा थोरला मुलगा असलेले अविनाश साबळे यांना योगेश हा भाऊ आहे. अविनाश साबळे हे भारतीय सैन्य दलात सुभेदार पदावर आहेत.

तीन हजार मीटर स्टीपलचेस (अडथळ्यांची शर्यत) प्रकारातील ते भारतीय खेळाडू आहेत. पटियाळा येथे फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अविनाश यांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यांनी सात मिनिटे २०.२० सेकंदांत नवा विक्रम नोंदवत यंदा पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे. यापूर्वीही त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

beed
Republic Day 2024 : सोलापूरच्या लेकीला मिळणार राष्ट्रपती पदक! तामिळनाडूमध्ये सीबीआय’च्या संयुक्त संचालक

विविध स्पर्धांमध्ये सहभाग

दरम्यान, आपल्या गरिबीमुळे त्यांना उच्चशिक्षण घेता आले नाही. मात्र त्यांनी धावण्याचा सराव कायम केला. दहा वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. सैन्य दलांतर्गत २०१५ मध्ये स्पर्धेत प्रथम सहभागी होत त्यांनी पारितोषिक पटकावले होते. त्यानंतर त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाचे प्रतिनिधित्व केले. २०२० मध्ये त्यांची टोकियो येथील ऑलिंपिकसाठी निवड झाली होती. १९५२ नंतर या ऑलिंपिकसाठी निवड होणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले होते.

पदके आणि पुरस्कारांची कमाई

यापूर्वी अविनाश साबळे यांना राष्ट्रकुल पदक, अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. २०२२ च्या बर्मिघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत त्यांनी रौप्यपदक मिळविले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननेही युवा क्रीडा पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com