Supporters Back Manoj Jarange Patil Hunger Strike Activists Pour Petrol on Themselves
sakal
मुरुड - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूर तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पाळण्यात आला. एकुरगा पाटी येथे आयोजित रास्ता रोको आंदोलनादरम्यान आंदोलक धनंजय घुटे यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले. या घटनेमुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना आवरल्याने अनर्थ टळला.