Parli Vaijnath News : सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, जितेंद्र आव्हाड, संदिप क्षिरसागर महादेव मुंडे कुटुंबियांच्या भेटीला

पिग्मी एजंट महादेव दत्तात्रय मुंडे यांचा धारदार शस्त्राने खून झाल्याच्या घटनेस १६ महिने होत आले आहेत.
MP Supriya Sule
MP Supriya Sulesakal
Updated on

परळी वैजनाथ - येथील बँक कॉलनी परिसरात राहणारे पिग्मी एजंट महादेव दत्तात्रय मुंडे यांचा धारदार शस्त्राने खून झाल्याच्या घटनेस १६ महिने होत आले आहेत. तरी अद्याप या प्रकरणातील आरोपींचा शोध लागला नाही. मंगळवारी (ता. १८) राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परळी येथे येऊन मुंडे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी तपास अधिकारी बदला अशी मागणी करत आपबीती कथन करून न्याय मिळत नसल्याची व्यथा खासदार सुळे यांच्या समोर मांडली. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

माझ्या पतीचा कोणासोबतच वाद नव्हता, त्यांची हत्या का झाली? कोणी केली? याची काहीच माहिती पोलिस देत नाहीत. आता १५ महिन्यांच्या नंतरही तपासात काहीच हाती लागले नाही व आता जी पोलीसांची चौकशी लावली आहे त्यातील चौकशी अधिकाऱ्यांनी या अगोदरच चौकशी केलेली आहे.

पुन्हा त्यांच्याकडेच चौकशीची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळत नसल्याची खंत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर व्यक्त केली. त्यानंतर लगेचच जाग्यावरुन खासदार सुळे यांनी बीडचे पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांना फोनवरून संपर्क केला.

मुंडे यांच्या हत्येच्या तपासातील प्रगती जाणून घेत खा. सुळे यांनी पोलिस अधीक्षक कॉवत यांच्याकडे लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली. तसेच तपासात काय प्रगती झाली याची माहिती मुंडे कुटुंबांना वेळोवेळी देण्यात यावी असेही खासदार सुळे म्हणाल्या. त्यावर मी स्वतः मुंडे कुटुंबाला माहिती देईल, असे पोलिस अधीक्षक कॉवत म्हणाले.

महादेव मुंडे खून प्रकरण....

महादेव मुंडे हे भोपळा येथील रहिवासी होते, सध्या शहरातील बँक काँलनीत राहत होते. २२ आँक्टोबर रोजी महादेव मुंडे यांचा मृतदेह येथील तहसील कार्यालयासमोरील मैदानावर सकाळी आढळून आला होता. या खून प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा घटना घडल्यानंतर परळी शहर पोलिसांनी तपास केला. परंतु या तपासात पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यात यश आले नव्हते.

पोलीस उपअधिक्षकांच्या विशेष पोलीस पथकामार्फत चौकशी सुरू

येथील महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. साबळे व एलसीबीचे हवालदार आहेत. या पथकामार्फत सध्या आरोपींचा शोध चालू आहे. यासाठी काहींची चौकशीही सुरू असून धागेदोरे सापडावेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com