Supreme Court Sets Deadline for ZP and Panchayat Samiti Elections
येरमाळा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मार्च एप्रिलपर्यंत लांबणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून,सर्वोच्च न्यायालयाने थेट तारीख निश्चित करत १५ फेब्रुवारीपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.या निर्णयामुळे गेल्या आठवड्यांपासून संभ्रमात असलेल्या राज्यातील राजकीय वातावरणाला दिशा मिळाली आहे.