'सत्तेसाठी 2019 ची वाट पाहावी लागणार नाही' 

तुकाराम शिंदे/दिलीप पवार - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

जालना - "उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकल्यावर राष्ट्रवादीला सत्तेसाठी 2019 ची वाट पाहावी लागणार नाही,' असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वडीगोद्री येथील जाहीर सभेत बोलताना केले. राज्य व केंद्रातील भाजप सरकार हे जाहिरात सरकार असल्याची जोरदार टीका त्यांनी केली. 

केंद्राच्या अहवालानुसार गेल्या वर्षी सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आता कुणावर खुनाचे गुन्हे दाखल करायचे, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र दिले जात नाही, असे म्हणत सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. मालाला भाव नाही म्हणून तो रस्त्यांवर टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असताना सरकार मात्र खोटी आश्‍वासने देऊन लोकांची फसवणूक करीत आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने काळापैसा बोहर येईल, असे सांगितले गेले. पवार साहेबांनीही मग या निर्णयाला पाठिंबा दिला; पण घडले उलटेच. बॅंकेसमोर पैसे काढण्यासाठी लागलेल्या रांगामध्ये कुठेही टाटा, बिर्ला, अमिताभ दिसेल नाहीत, होते ते सर्वसामान्य गोरगरीब. यात दीडशे जणांना आपले प्राण गमवावे लागले. जो काळा पैसा पकडला गेला तो भाजपच्याच लोकांचा निघाला. 

"कर्जमाफी ऐकली नाही' 
शिवसेना-भाजप भाषणांमधून एकमेकांवर आरोप करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात कधी शेतकऱ्यांची कर्जमाफी ऐकली नाही; पण मुख्यमंत्र्यांचे पाणी मात्र ते काढताहेत. शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही, असे आश्‍वासनदेखील त्यांनी उपस्थितांना दिले.

Web Title: supriya sule in jalna