
बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरही जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारलेली नाही. शिवराज दिवटे याच्यावरील हल्ला साधा नाही. उर्वरित आरोपींना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी करुन आजही काही पोलिस नेत्यांसाठी काम करत असल्याचा आरोप करुन त्यांना जिल्ह्याबाहेर हलविण्याची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली.