
Suresh Dhas: पवनचक्कीच्या माध्यमातून काळे धंदे आणि खोट्या गुन्ह्यांचे आमदार सुरेश धस हेच मास्टर माईंड असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे यांनी केला. श्री खाडे यांनी आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून हे आरोप केले.
आपल्यावर दोन वेळा हल्ले, दोन खोट्या अट्रोसिटी, विनयभंग आणि पोस्को व जीवे मारण्याच्या प्रयत्नाखाली गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला. सरपंच देशमुख यांच्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही, ही घटना निंदनीय आहे.