सरकार स्थापनेसाठी सर्जरीवर सर्जरी ः रावसाहेब दानवे

शिवचरण वावळे
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नांदेडः डॉक्टर कितीही हूशार असले तरी, त्यांच्या सोबतीला उत्तम दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची तितकीच गरज असते. त्या शिवाय डॉक्टरचे शहाणपण उपयोगी पडत नाही आणि जिथे दोन्हीचा संगम जुळुन येतो तिथेच गुणवत्तापूर्ण काम होते. अशाच प्रकारचे प्रयत्न अनेक पेच निर्माण झाले असतानादेखिल सरकार स्थापनेसाठी सर्जरीवर सर्जरी करण्याचे काम सुरू आहे, तरीही सरकार काही स्थापन होईना असे सूचक विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नांदेडमध्ये केले.   
 

नांदेडः डॉक्टर कितीही हूशार असले तरी, त्यांच्या सोबतीला उत्तम दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची तितकीच गरज असते. त्या शिवाय डॉक्टरचे शहाणपण उपयोगी पडत नाही आणि जिथे दोन्हीचा संगम जुळुन येतो तिथेच गुणवत्तापूर्ण काम होते. अशाच प्रकारचे प्रयत्न अनेक पेच निर्माण झाले असतानादेखिल सरकार स्थापनेसाठी सर्जरीवर सर्जरी करण्याचे काम सुरू आहे, तरीही सरकार काही स्थापन होईना असे सूचक विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नांदेडमध्ये केले.   
 

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे शनिवारी (ता.१६) नांदेड येथील एका खासगी रुग्णालयाच्या ‘कार्डीॲक केअर व कॅथलॅब’ सेंटरच्या उद्‍घाटनासाठी आले होते. या वेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन व्हावे यासाठी आम्ही अनेक प्रकारच्या सर्जरीवर सर्जरी करीत आहोत. पण सत्ता स्थापनेचा गुंता काही केल्या सुटत नसल्याचे सांगितले. डॉक्टर कितीही हूशार असले तरी, त्यांच्या सोबतीला उत्तम दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची तितकीच गरज असते. त्या शिवाय डॉक्टरचे शहाणपण उपयोगी पडत नाही आणि जिथे दोन्हीचा संगम जुळुन येतो तिथेच गुणवत्तापूर्ण काम होते. असे विधान करून अप्रत्यक्षपणे शिवसेनेसोबत पुन्हा युती झाल्यास राज्याचा गुणवत्तापूर्ण विकास होऊ शकतो असे सूचक विधान त्यांनी केले. 
 

या वेळी व्यासपीठावर आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

बदलत्या समिकरणांमुळे अनेकांना येईल ह्रदयविकाराचा झटकाः पाटील 

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीदेखिल नव्या राजकीय समिकरणाबद्दल आशावाद व्यक्त करताना राज्यात बदलत्या राजकीय समिकरणांमुळे अनेकांना ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यांच्यासाठी ‘कार्डीॲक केअर व कॅथलॅब’ मध्ये अनेकांच्या ह्रदयावर सर्जरी कराव्या लागतील आणि त्यासाठी आता दुर कुठे जाण्याची गरज नाही, असा टोला भाजपचे नाव न घेता खासदार हेमंत पाटील यांनी लगावला व रावसाहेब दानवे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा होती. परंतु, त्यांच्याएेवजी भाजपने भलताच उमेदवार दिला, ‘मी पुन्हा येईल’ म्हणणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची पाटील यांनी आठवण करुन दिली. 

रूग्णालयात रंगला जुगलबंदीचा सामना 

खासदार हेमंत पाटील यांच्या खोचक भाषणबाजीला भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर कशा प्रकारे उत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना खासदार श्री.चिखलीकर यांनीदेखिल श्री.दानवे यांच्याप्रमाणेच कुणावरही टीका न करता संयम पाळत रुग्णालयाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नेहमी भाषणबाजीतुन चर्चेत राहणारे श्री. दानवे यांनी या वेळी मात्र आपल्या संपूर्ण भाषणात कोणत्याही पक्षावर टीका- टिप्पनी न करता अतिशय सावधगिरीची भुमिका घेतल्याचे दिसून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surgery on Surgery to Establish Government: Ravasheb Danve