
बीड : जिल्हा पोलिस दलातील निलंबीत सहाय्यक फौजदाराला चोरीच्या गुन्ह्यात दुसऱ्यांदा अटक झाली आहे. यापूर्वी पोलिस अधीक्षक कार्यालयातील बॅटऱ्या चोरीप्रकरणी कोठडीची हवा खावी लागणाऱ्या या अधिकाऱ्याने आता दुचाकी चोरल्या आहेत. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. सात) रात्री उशिरा अटक केली. चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.