
परभणी ः जिल्हा रुग्णालयातील खाटपसाऱ्यांच्या खोलीसह धोबीघाटाला आग लागल्याची घटना घडली. शनिवारी (ता.सहा) रात्री खाटपसाऱ्याला तर रविवारी (ता.सात) सायंकाळी धोबीघाटमध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सलग दोन दिवस लागलेल्या आगीत संशयाचा धुर धुसमत आहे.
आगीमुळे रुग्णांचे हाल
जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागाच्यावरील मजल्यावर ठेवलेल्या लाकडी साहित्यास शनिवारी (ता.सहा) रात्री दहाच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे दवाखान्यात गोंधळ उडाला. आग लागल्याचे समजाताच दवाखान्यात धावपळ देखील झाली. परिणामी, रुग्णांचे हाल झाल्याचे पहावयास मिळाले.
रुग्णालय प्रशासनात खळबळ
या आगीच्या घटनेच्या १२ तासानंतर रविवारी (ता.सात) सायंकाळी साडेचार वाजता धोबीघाट मधील एका खोलीतील कपड्यांना अचानक आग लागली. या आगीत धोबीघाटच्या खोलीतील अनेक कपडे, बेडशिट जळून राख झाल्या. काही दिवसांपूर्वीच धोबीघाटमधील आणखी एका खोलीला आग लागली होती. त्यातही कपडे जळाले होते. सलग काही तासातच दुसरी घटना घडल्याने रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली घटनास्थळाची पाहणी
जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना गंभीर असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्वतः सायंकाळी जिल्हा रुग्णालयात येवून पाहणी केली. या वेळी उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्यासह सहायक पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे. पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांची उपस्थिती होती.
घटनास्थळावर दारुच्या बाटल्या
ज्या धोबीघाटमध्ये रविवारी आग लागली, त्या ठिकाणी दारुच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच या ठिकाणी इतरही काही आक्षेपार्ह वस्तू जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हा परिसर स्वच्छ करून या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केली आहे.
संपादन ः राजन मंगरुळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.