Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात औषधांचा संशयास्पद साठा आढळल्यावर त्याचे वाटप रोखले आणि नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवले. पुढील कारवाई अहवालाच्या आधारावर होणार आहे.
धाराशिव : राज्यात बनावट औषधांचे प्रकरण गाजत असतानाच धाराशिव जिल्ह्यातही औषधांचा संशयास्पद साठा आढळला आहे. ऑक्टोबरमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान तुळजापुरातील महाआरोग्य शिबिरासाठी त्याचा पुरवठा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.