स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धानोरा काळे (ता. पूर्णा) येथील गोदावरी नदी पात्रात उपोषण सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या थकबाकीबाबत राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Saghtana) आज (ता. २०) धानोरा काळे (ता. पूर्णा जि. परभणी) येथील गोदावरी नदीच्या (Godavari River) पात्रात आमरण उपोषण सुरू केले आहे.