

Two SRTMU professors honoured with state teacher awards
Sakal
नवीन नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील दोन वरिष्ठ प्राध्यापकांना मिळाला आहे. वर्ष २०२४-२५ साठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, तर वर्ष २०२५-२६ साठी नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सलग दोन वर्षे विद्यापीठातील प्राध्यापकांना हा राज्यस्तरीय सन्मान मिळणे ही विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेची महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.