

माहूर: श्री रेणुका देवी मंदिर व परिसरातील दानपेठ्या उडून मोजदाद सुरू असताना पाहणी करताना तहसीलदार तथा कोषाध्यक्ष अभिजीत जगताप,विश्वस्त मंडळ आणि संस्थानाचे कर्मचारी.
Sakal
माहूर : माहूरगड येथील श्री रेणुकादेवी संस्थानच्या मंदिरामधील सभा मंडपातील-४ दानपेट्या,महालक्ष्मी माता-१,तुळजाभवानी माता-१,मंदिर परिसरातील-२ व परशुराम मंदिराकडे -३ असे एकूण ११ दानपेट्या ता.८ रोजी उघडण्यात आल्या आहेत.त्यात मागील एक महिन्यातील श्री रेणुका देवी संस्थानचे सर्व बाजूने मिळून एकत्रित उत्पन्न हे एकूण रक्कम रुपये ६५ लाख ७ हजार ६१७ रुपये इतके झाले आहे.