Beed Farmers News: अवकाळी पावसाची धास्ती; टरबुजाला बाजारात मिळतोय कवडीमोल भाव.

Financial Losses for Farmers in Takarvan: टाकरवणमधील शेतकऱ्यांच्या टरबुज पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. बाजारात भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढले आहे.
Beed Farmers News

Beed Farmers News

esakal

Updated on

टाकरवण: शेताच्या बांधावर उभं राहून जेव्हा ज्ञानेश्वर गाडे आपल्या हिरव्यागार टरबुजाच्या वेलांकडे पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात कौतुकाऐवजी चिंतेची ढग गडद होतात. गेल्या तीन-चार महिन्यांपासून रक्ताचं पाणी करून, रात्रंदिवस एक करून त्यांनी हे पीक फुलवलं होतं.

निसर्गानेही सुरवातीला साथ दिली, फळं टपोरी झाली आणि पदरात चार पैसे पडतील अशी आशा निर्माण झाली. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. ऐन तोडणीच्या वेळी आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि टाकरवण परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टावर पाणी फेरलं गेलं.

गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसाच्या धास्तीने टरबूज उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com