Takravan Lake Illegal Water Pumping: टाकरवण तलावातील अवैध पाणी उपशावर प्रशासनाची कारवाई; मोटारी काढल्या बाहेर
Takravan Water Issue: टाकरवण गावातील तलावातून शेतीसाठी सुरू असलेल्या अवैध पाणी उपशावर प्रशासनाने कारवाई करत मोटारी जप्त केल्या.दैनिक ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच लघुपाटबंधारे विभागाने तलावाला भेट देऊन पाणीसाठा वाचवण्यासाठी पावले उचलली.
टाकरवण : उन्हाचा पारा वाढताच परिसरातील जलस्रोत आटल्याने शेतकरी गावतलावातून शेतीसाठी अवैध पाणी उपसा करत आहेत. या तलावामुळे पशु-पक्ष्यांसह परिसरातील पाणीपातळीत वाढ होते.