Beed News: लिंबाचे भाव कडाडले; बाजारात मागणी वाढली

Rising Lemon Prices in Takrawan: टाकरवण बाजारात उन्हाळ्यात लिंबाची मागणी वाढली. अवकाळी पावसामुळे आवक कमी, दर गगनाला भिडले; शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा.
Beed News

Beed News

esakal

Updated on

टाकरवण: उन्हाळ्याची चाहूल लागताच तापमानाचा पारा वाढू लागला असून, शरीराला थंडावा देणाऱ्या लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत. काही दिवसांपूर्वी दहा रुपयांना १५ नग मिळणारे लिंबू आता पाच रुपयांना एक या दराने विकले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com