
येथील पोलीस मुख्यालयात बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार ,आदींची उपस्थिती होती.
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथे (ता. ३०) आॅक्टोंबर रोजी तलाठ्याने जावयास हात पाय बांधून विहिरीत टाकून खून केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासात छडा लावून एकास गजाआड केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी बुधवार (ता. चार) पत्रकार परिषदेत दिली.
येथील पोलीस मुख्यालयात बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार ,आदींची उपस्थिती होती.
कलासागर पुढे म्हणाले, सेनगाव तालुक्यातील सिंदेफळ येथील वैभव जयचंद वाठोरे (वय २१) यास मधुकर लोनकर तलाठी व इतर तीन ते चार जणांनी बाभूळगाव येथे रेतीचे ट्रॅक्टर पकडण्यास आपल्याला जायचे असे सांगून सोबत नेले. त्यानंतर चांगेफळ शिवारातील हरीशचंद्र शिंदे यांच्या शेतातील विहरीमध्ये हात पाय बांधून टाकून मारल्याची घटना( ता.३०) आँक्टोंबर ते (ता.२) नोव्हेंबर रोजी घडली होती. त्यानंतर या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी पोउपनी किशोर पोटे व कर्मचारी यांचे पथक स्थापन केले.मात्र वैभव वाठोरे याचा शोध लागत नसल्याने जयचंद वाठोरे यांनी नरसी पोलीस ठाण्यात (ता.३) नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल झाला होता.पथकाने घटना स्थळी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपी मधुकर लोनकर यास ताब्यात घेतले.
आरोपी मधुकर हा मुलीच्या विवाहासाठी दुसरे स्थळ बघत होता
अधिक माहिती घेतली असता गुन्ह्यातील वैभव वाठोरे यांच्या सोबत आरोपी मधुकर लोनकर याने मुलीचा घरगुती विवाह लावून दिला होता.त्यानंतर काही दिवसातच जावयाचे पटत नसल्याने घरगुती फारकत घेतली होती. सदर फारकत ही वैभव वाठोरे यास मान्य नव्हती, मात्र आरोपी मधुकर हा मुलीच्या विवाहासाठी दुसरे स्थळ बघत होता.वैभव वाठोरे हा दुसऱ्या लग्नासाठी अडथळा निर्माण करीत असल्याने आरोपी मधुकर लोणकर याने मेव्हणा बालाजी दिपके यांच्या सोबत कट कारस्थान रचून वैभव वाठोरे सोबत जवळीक साधून त्यास विश्वासात घेत (ता.३०) आँक्टोंबर रोजी बाभूळगाव येथे रेतीचे ट्रॅक्टर पकडण्यास जायचे म्हणून चांगेफळ शिवारात दारू पाजवून त्यास पायाला दोरीने दगड बांधून आत्महत्या करीत असल्याबाबत चिट्ठी लिहून सदर चिठी भिजवून जाऊ नये म्हणून पॉलिथिन बॅग मध्ये पँटच्या खिशात स्टेपल करून दोघांनी विहिरीत ढकलून देऊन जीवे मारल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
संपादक - प्रल्हाद कांबळे