esakal | अवैध धंद्यांबाबत बोलणे पडले महागात
sakal

बोलून बातमी शोधा

police

अवैध धंद्यांबाबत बोलणे पडले महागात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औसा: गावात वाढलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्यांना सहायक पोलिस निरिक्षकाने उलट शब्द वापरले होते. या पार्श्वभूमीवर मोर्चाचा इशारा देताच जिल्हा पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी सहायक पोलिस निरिक्षकाच्या बदलीचे आदेश दिले आहेत.

भादा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावात वाढलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर हे येथील सहायक पोलिस निरिक्षक नाना लिंगे यांच्याकडे गेले होते. दरम्यान, नाना लिंगे यांनी श्री. खंडापूरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांना अपशब्द वापरले होते. याचे पडसाद उमटत असतानाच समितीच्या वतीने पोलिस ठाण्यावर महिला मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. या अगोदरच जिल्हा पोलिस अधिक्षक पिंगळे यांनी नाना लिंगे यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यांच्या जागी गातेगाव ठाण्यात कार्यरत असणारे विलास शहाजी नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

loading image
go to top