Dharashiv News: उन्हाळ्यात चिंच हंगाम तेजीत; ग्रामीण महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी

Tamarind Season Brings Rural Employment: धाराशिव परिसरात उन्हाळ्यात चिंच हंगाम सुरू; ग्रामीण महिलांना झाडावरून चिंचा फोडून घरबसल्या रोजगाराची संधी मिळत आहे.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागातील अर्थचक्राला गती देणारा चिंच हंगाम सध्या जोमात आला आहे. झाडावरून चिंचा उतरवणे, फोडणे अन् त्यातील चिंचोके वेगळे करणे या कामांमुळे ग्रामीण भागातील महिलांना ही रोजगार मिळत आहे.

चिंच फोडण्याचा व्यवसाय हा प्रामुख्याने यंत्राच्या साह्याने नव्हे तर हाताने केला जाणारा व्यवसाय आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत ग्रामीण भागात चिंच फोडण्याचे केंद्र तयार होतात. एका किलोला साधारणतः २५ रुपयांप्रमाणे मजुरी दिली जात आहे. एखादी महिला दिवसाला १५ ते २० किलो चिंच फोडू शकते, ज्यामुळे तिला रोज ३५० ते ५०० रुपयांपर्यंत घरबसल्या रोजगार मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com