

Krishna Marathwada Water Scheme Stalls After Ministerial Change Tanaji Sawant Raises Concerns Over Drought in Marathwada Region
esakal
-धनंजय शेटे
भूम: मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवरून माजी मंत्री तथा आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत कृष्णा-मराठवाडा पाणी योजनेच्या रखडलेल्या कामावर बोट ठेवले आहे. मंत्रिपदाच्या कार्यकाळात या योजनेला गती देत सुमारे १५ हजार ५०० कोटी रुपयांचे बजेट उपलब्ध करून दिले होते. त्यावेळी कामाने वेग घेतला; मात्र २०२४ च्या निवडणुकीनंतर सत्तेच्या समीकरणात बदल झाल्याने या कामाचे नियोजन आणि निधीचे पुनर्नियोजन अपेक्षेप्रमाणे झाले नाही. परिणामी, दुष्काळाच्या काळात उपलब्ध होऊ शकणाऱ्या पाण्याचा लाभ मराठवाड्याला मिळू शकला नाही, अशी खंत सावंत यांनी व्यक्त केली.