वाशी - पवनचक्कीचे काम करणा-या सेरेंटीका व रिनिवल कंपनीने तात्काळ मावेजा देण्याच्या मागणीसाठी तीन दिवसापासुन तहसिल कार्यालयासमोर सुरु असलेल्या तांदुळवाडी ता. वाशी येथील शेतक-यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवार (ता. २७) तांदुळवाडी येथील जवळपास ७० ते ८० महिलांनी तहसिल कार्यालय गाठत तहसिलदार प्रकाश म्हेञे यांच्या दालनासमोर प्रहार संघटनेच्या सोलापुर जिल्हा महिला अध्यक्ष संजीवनी बारगुंळे यांच्या नेतृत्वात तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन करुन तालुक्यात पवनचक्कीची सुरु असलेली कामे संबधीत कंपन्या व सर्व संबधीत शेतक-यांची बैठक होईपर्यत बंद करण्याची मागणी केली.