
बीड : १४ नोव्हेंबर २००० चा दिवस. जिल्हा रुग्णालयात अचानक एक रुग्ण अत्यवस्थ स्थितीत आला. त्याला रक्ताची गरज होती. याचवेळी २० वर्षीय युवक स्वेच्छेने पुढे आला आणि त्याने पहिले रक्तदान केले. या घटनेनंतर रुग्णाला जीवदान मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून या युवकाने वर्षातून चारदा रक्तदानाचा संकल्पच केला. आतापर्यंत तब्बल ८५ वेळा रक्तदान करण्यासह त्याने अनेकांना प्रोत्साहित केले आहे.