
जालना : तालुक्यातील शेवगा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या चौथीच्या विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थांनी बुधवारी (ता.५) शाळेत चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. प्रल्हाद सोनवणे असे या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.