
बीड : इकडून तिकडे भटकंती, मिळेल ते खायचे आणि निवारा मिळेल तिथे राहायचे असा प्रवीण शांताप्पा हानमागौंडा यांचा पाच वर्षांचा प्रवास. कोविड काळात हातचे काम गेल्याने मानसिक धक्का आणि भाषेचाही अडसर असल्याने ते कुटूंबापासून दूरच होते. पण, पाच वर्षांनी त्यांना कुटुंब भेटले. याला कारणीभूत ठरले अशोक कदम.