esakal | राष्ट्रीय शिक्षक दिनी मराठमोळ्या शिक्षकाचा राष्ट्रपतींकडून सन्मान
sakal

बोलून बातमी शोधा

मराठमोळ्या शिक्षकाचा राष्ट्रपतींकडून सन्मान

मराठमोळ्या शिक्षकाचा राष्ट्रपतींकडून सन्मान

sakal_logo
By
अविनाश काळे,

उमरगा : भारत सरकारच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी देशातील प्रतिभावान शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केला जातो. या वर्षीही देशातील ४४ निवडक शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण शिक्षक दिनी रविवारी (ता. पाच) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षा राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी,  सुभाष सरकार व  राजकुमार  रंजनसिंह यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण करण्यात आले. दरम्यान मुंबई येथे राज्य शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप, अवर सचिव श्री. रासकर, सहाय्यक संचालक महेश चोथे, संजय वाघमारे यांच्या हस्ते श्री. खोसे यांना सपत्नीक मेडल व राजपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

मराठवाड्यातून एकमेव शिक्षक म्हणून श्री. खोसे यांची या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. यापूर्वीही त्यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार प्राप्त झाला आहे. असे राष्ट्रीय स्तरावरील दोन्ही पुरस्कार मिळवणारे कमी वयातील एकमेव एकमेव शिक्षक आहेत. श्री. खोसे यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या सहकार्याने त्यांच्या एकूण सेवेमध्ये बेळंब तांडा व जगदंबा नगर कडदोरा या दोन्ही शाळा डिजिटल केल्या आहेत.

तसेच ग्रामीण भागातील मुलांना  आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण मिळण्यासाठी ऑफलाईन ॲप्स, ऑनलाइन टेस्टच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. कोरोना काळामध्ये मुलांना शिक्षणामध्ये रुची कायम राहावी, यासाठी तयार केलेले ऑनलाईन गेम्स असतील, त्याच्या साह्याने त्यांनी आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला विशेष अधिकार दिलेत का? चित्रा वाघ यांचा सवाल

तसेच जिथे शंभर टक्के बंजारा जमातीतील मुले होती, तेथील मुलांना त्यांच्या बोलीतून शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी इयत्ता पहिलीचा पाठ्यपुस्तक बंजारा बोली भाषांमध्ये अनुवादित करून त्यांना खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण संस्कार सप्ताह शाळेतील सहकार्‍यांच्या मदतीने राबवून उपक्रम राज्यभर दिशा देणारा ठरला होता. दरम्यान, शिक्षणमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनीही श्री. खोसे यांचा सपत्नीक सत्कार केला.

loading image
go to top