esakal | हेडमास्तर होण्यासाठी आठशे शिक्षकांची नकारघंटा, पदोन्नतीला सतराशे विघ्न
sakal

बोलून बातमी शोधा

03teacher1_20fb_0

लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची ८२ पदे रिक्त असली तरी सरकारच्या धोरणानुसार केवळ खुल्या प्रवर्गातील ४८ जागांवर पदोन्नतीचे काम शिक्षण विभागाने हाती घेतले आहे. शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होताच पदोन्नतीची चाहूल लागली होती.

हेडमास्तर होण्यासाठी आठशे शिक्षकांची नकारघंटा, पदोन्नतीला सतराशे विघ्न

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अर्थात हेडमास्तर होण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षक उत्सुक नसल्याची स्थिती आहे. जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वी पात्र शिक्षकांची यादी जाहीर करून यादीतील शिक्षकांचा पदोन्नतीसाठी होकार किंवा नकार कळविण्याचे आदेश पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते.

त्यानुसार ९७९ पैकी तब्बल ८३३ शिक्षकांनी मुख्याध्यापक होण्यासाठी नकार कळवला आहे, तर केवळ १४६ शिक्षकांनी होकार कळवला असून मंगळवारपासून (ता. १५) पदोन्नतीसाठी हाती घेतलेला समुपदेशन कार्यक्रमही अचानक रद्द केल्यामुळे पदोन्नतीला सतराशे विघ्न लागल्याची चर्चा घडून येत आहे.

रुग्णालयांमध्ये महिनाअखेर एक हजार ८०८ बेड्स होणार उपलब्ध, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत


जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची ८२ पदे रिक्त असली तरी सरकारच्या धोरणानुसार केवळ खुल्या प्रवर्गातील ४८ जागांवर पदोन्नतीचे काम शिक्षण विभागाने हाती घेतले आहे. शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होताच पदोन्नतीची चाहूल लागली होती. यातूनच १५ ऑगस्टपूर्वी शिक्षण विभागाने ९७९ पात्र शिक्षकांची यादी जाहीर करून ती अद्ययावत करण्यासोबत संबंधित शिक्षकांचा होकार व नकार कळवण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार काही दिवसांत होकार-नकाराची प्रक्रिया पार पडली.

मुलाने कुत्र्याला दगड मारल्याचा जाब विचारताच चाकू हल्ला, औरंगाबादेत धक्कादायक...

त्यानंतर जिल्हा परिषदेने गेल्या आठवड्यात पदोन्नतीसाठी होकार कळवलेल्या शिक्षकांची यादी जाहीर करून त्यांच्या समुपदेशनाचा कार्यक्रम जाहीर केला होता. यात तब्बल ८३३ शिक्षकांना पदोन्नतीसाठी नकार दिल्याचे पुढे आले. एकदा नकार दिल्यानंतर तीन वर्षांनी होकार देण्यासाठी पात्र ठरलेल्यांनीही नकार देण्याची परंपरा कायम ठेवल्याने मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीत यंदाही नकारघंटा जोरात वाजली. पदोन्नतीनंतर गैरसोयीच्या ठिकाणी होणारी नियुक्ती व जबाबदारीचे काम पाहता मोठ्या संख्येने शिक्षकांनी मुख्याध्यापक होण्यासाठी नकार दिल्याचे दिसत आहे. यात होकार दिलेल्यांनी पदोन्नतीनंतर सोयीच्या ठिकाणी होणाऱ्या नियुक्तीचा एकमेव दृष्टिकोन समोर ठेवला आहे. मनातून पदोन्नतीसाठी होकार देणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढीच आहे.

औरंगबाद जिल्ह्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र बुधवारपासून रात्री नऊनंतर बाजारपेठा...

दिव्यांगांसाठी समुपदेशन रद्द
मुख्याध्यापक तसेच विस्तार अधिकारी (कनिष्ठ) या दोन्ही पदांसाठी सोमवारपासून (ता. १४) ते शुक्रवारपर्यंत (ता. १८) समुपदेशन कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. विस्तार अधिकाऱ्यांसाठी सोमवारी तर उर्वरित कालावधीसाठी मुख्याध्यापकांचे समुपदेशन होते. यात दिव्यांगांची तीन टक्के पदे पदोन्नतीने भरण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्यानंतर समुपदेशनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दिव्यांगांच्या पदोन्नतीसाठी शंभर शिक्षकांची यादी शिक्षण विभागाने जाहीर करण्यात आली असून, पदोन्नतीनिमित्त या सर्व शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी होणार आहे. यामुळे पदोन्नतीसाठी दिव्यांग शिक्षकांचा कस लागण्याची चिन्हे आहेत.


संपादन - गणेश पिटेकर