Jalna Crime : मित्राची मस्करी भोवली; दोघांवर चाकूहल्ला, तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा, नाव्हा चौफुली परिसरातील घटना

Crime News : फोटोशूटदरम्यान मित्राची मस्करी करत असताना झालेल्या वादातून पार्थ फाटे या १८ वर्षीय तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. त्याच्यासह भांडण सोडवायला आलेल्या तरुणालाही चाकूने जखमी करण्यात आले असून, पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Jalna Crime
Jalna Crimesakal
Updated on

जालना : मित्राची मस्करी करत असताना मित्रासोबत आलेल्या दोन जणांना राग आल्याने मस्करी करणाऱ्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात पार्थ दिलीप फाटे (वय १८, रा. आर.टी.पी.एस., जालना) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दोघांविरोधात तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com