Beed News: वडिलांनी घेतली उचल, पण त्यांच्या बालकाचा छळ; करून घेतली कष्टाची कामे, चार वर्षांनंतर पळ काढलेल्या मुलास भेटले देवदूत
Child Labor: बीड तालुक्यातील अंथरवण पिंपरीत एका मुलाला चार वर्षे शेळ्या सांभाळण्यास आणि शेतातील वेठबिगार काम करण्यास लावल्याचा प्रकार उघड झाला. मुलाने स्वतःची सुटका करून घेतली आणि लोकांनी त्याचा सांभाळ केला.
बीड : ऊसतोडणीला मजूर पुरविण्यासाठी एकाने घेतलेल्या पैशांपोटी दांपत्याला व त्यांच्या मुलाला चार वर्षे कष्टाची कामे करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील अंथरवण पिंपरी येथे समोर आला.