

Illegal Mining Crisis: District Collector Vinay Gowda Intervenes in Tembhapuri Case
Sakal
शेंदूरवादा : गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी मध्यम प्रकल्प परिसरात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या अवैध मुरूम व माती उत्खननाच्या प्रकारामुळे प्रशासनाची झोप उडाली असून या प्रकरणाची गंभीर दखल आता जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी घेतली आहे. अवैध उत्खननामुळे निर्माण झालेल्या खोल खड्ड्यांमध्ये पाणी साचून अनेक दुर्घटना घडल्या असून गेल्या आठवड्यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.