केज : ध्वनी प्रदूषणामुळे त्रास होत असल्याने आवाज कमी करण्याच्या मागणीची तक्रार केल्याच्या कारणावरून संतापलेल्या गावच्या सरपंचासह दहा जणांनी गावातील एका महिला वकिलास बेदम मारहाण केल्याची घटना 14 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सनगाव (ता. अंबाजोगाई) येथे घडली आहे. या प्रकरणी दहा जणांविरोधात युसूफवडगाव पोलीस ठाण्यात (Yusuf Wadgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहेत.