bajar pbn
bajar pbn

दहा हजारांचे मिळणार मुदती कर्ज, कोणाला ते वाचा... 

परभणी ः केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान आत्मनिर्भर निधी या योजनेतून नागरी पथविक्रेत्यांना खेळते भांडवल म्हणून मुदती रोख दहा हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून राज्याच्या नगरविकास विभागाने त्या संबंधीचे आदेश निर्गमित केले आहेत.तसे महापालिकेची पथविक्रेत्यांच्या ऑनलाइन व बायोमेट्रीक नोंदणीसाठी धावपळ सुरू झाली आहे. गेल्या चार वर्षापासून सुरु झालेले काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. 

पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम 
शहरी पथविक्रेते शहराच्या अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक समजला जातो. प्रत्येक भागात तो पथविक्रेता, ठेलेवाला, रेहरीवाला, ठेलीफडवाला अशा विविध नावाने ओळखले जातात. कोविड-१९ ची साथ सर्वत्र पसरली असून टाळेबंदीमुळे पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम झाला आहे. हे बहुतांश विक्रेते कमी भांडवलावर व्यवसाय करतात व बंदीमुळे त्यांचे भांडवल शिल्लक राहण्याची शक्यता नसल्यामुळे केंद्र शासनाने या योजनेत त्यांना दहा हजार रुपये सूक्ष्म पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने विक्री प्रमाणपत्र दिलेले व ओळखपत्र असलेले तर पालिकेच्या सर्वेक्षणात आढळलेले परंतू, विक्री प्रमाणपत्र, ओळखपत्र न दिलेले पथविक्रेतेसाठी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. 

नोंदणीसाठी महापालिकेची धावपळ 
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर महापालिका गेल्या तीन-चार वर्षापासून या पथविक्रेत्यांच्या बायोमेट्रीक नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी पालिकेने एजन्सी देखील नियुक्त केलेली असून राजकीय अडथळ्यांमुळे नोंदणीचे काम ठप्प झाल्याचे दिसून येते. हॉकर्स झोन निश्चित करण्यासाठी पथविक्रेत्यांची नोंदणी आवश्यक असून त्यांचे प्रतिनिधी असलेली समिती हॉकर्स झोन व त्यातील पथविक्रेत्यांची निश्चिती करणार आहे. परंतू, नोंदणीच होऊ दिल्या जात नसल्यामुळे हॉकर्स झोनचा तिढा सुटलेला नसून शहरातील सर्व रस्ते या पथविक्रेत्यांनी काबीज केलेले असून मोठ्या प्रमाणात रहदारीला अडथळे निर्माण होतात. आता कर्जाच्या निमित्ताने का होईना, पालिकेने पथविक्रेत्यांची नोंदणी करण्याचे काम हाती घेतले आहे. ही नोंदणी देखील होऊ दिल्या जाते की नाही, पथपुरवठ्यासाठी देखील राजकीय दबाव वाढणार का, हे आगामी काळात दिसून येणार आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com