Marathwada Graduates Constituency Election voters confusion
sakal
लोहारा (जि. धाराशिव) - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील दोन पक्षांच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे उमेदवारी दाखल केल्याने आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचार बॅनरवर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची ठळक छायाचित्रे लावून प्रचार करत असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार न दिल्याने आघाडीतील समन्वयाचा विषयही चर्चेत आला आहे.