परीक्षेला डमी उमेदवार बसवून नोकरी मिळवणारा जेरबंद 

प्रल्हाद कांबळे - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नांदेड - विविध स्पर्धा परीक्षांत डमी उमेदवार बसवून त्यांच्याकडून लाखोंची माया जमा करून शासनाची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा यापूर्वीच पर्दाफाश करण्यात आला होता. या प्रकरणात एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये तीस गुन्हे दाखल आहेत. हे प्रकरण सध्या सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यातच नांदेड जिल्ह्यातील मांडवी येथील एका तरुणाने डमी उमेदवाराचा वापर करून नोकरी मिळविल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात अडीच महिन्यांपूर्वी या तरुणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. पुणे व नांदेड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या तरुणाला पुणे येथून शनिवारी (ता. 12) अटक केली.

नांदेड - विविध स्पर्धा परीक्षांत डमी उमेदवार बसवून त्यांच्याकडून लाखोंची माया जमा करून शासनाची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा यापूर्वीच पर्दाफाश करण्यात आला होता. या प्रकरणात एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये तीस गुन्हे दाखल आहेत. हे प्रकरण सध्या सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यातच नांदेड जिल्ह्यातील मांडवी येथील एका तरुणाने डमी उमेदवाराचा वापर करून नोकरी मिळविल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणात अडीच महिन्यांपूर्वी या तरुणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. पुणे व नांदेड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या तरुणाला पुणे येथून शनिवारी (ता. 12) अटक केली. रविवारी त्याला किनवट न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. हा तरुण पुणे येथील समाजकल्याण कार्यालयात कार्यरत होता. 

पोलिस, महसूल, समाजकल्याण अशा विविध विभागांतील स्पर्धा परीक्षांत डमी उमेदवार बसवून शेकडो जणांना शासकीय नोकऱ्या मिळवून देऊन त्यांच्याकडून लाखोंची माया जमा करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा काही दिवसांपूर्वी पर्दाफाश झाला होता. मांडवी येथील योगेश जाधव व नांदेड येथील भाजपच्या पदाधिकारी डॉ. शोभा वाघमारे यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यात नांदेड जिल्ह्यातील मांडवी येथील सचिन दत्तात्रय श्रीमनवार यानेही अशाच पद्धतीने पुणे येथील समाजकल्याण कार्यालयात नोकरी मिळविली होती. दरम्यानच्या काळात सचिनने बनावट पद्धतीने नोकरी मिळविल्याचे पोलिस तपासात पुढे आल्याने त्याच्याविरुद्ध मांडवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरारी होता. पुणे व नांदेड पोलिस त्याचा शोध घेत होते. शनिवारी त्याला पुणे येथे अटक करण्यात आली. नांदेड येथे आणून किनवटच्या प्रथमवर्ग कनिष्ठ स्तर न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 17 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मुख्यमंत्र्यांकडून दखल 

फसवणूक करणारी टोळी गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा गोरखधंदा करीत होती. डमी उमेदवार परीक्षेला बसवून अनेकांकडून लाखोंची माया जमा करणारे हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी ते तपासासाठी सीआयडीकडे वर्ग केले होते. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक डी. डी. सोनसकर करीत आहेत.

Web Title: Test dummy candidates to take the job to win martingale