esakal | जिंतूर-जालना रोडवर संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला

बोलून बातमी शोधा

null
जिंतूर-जालना रोडवर संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला
sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर (परभणी) : जिंतूर-जालना रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ ३५ वर्षीय तरुणाचा लिंबाच्या झाडाखाली संशयास्पद मृतदेह आढळून असल्याची घटना शनिवारी (एक मे) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी घटनेची नोंद केली आहे.

याबाबत सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, शहरापासून दोन किमीवर पेट्रोल पंपाजवळ लिंबाजी नारायण मेटकर (वय ३५,रा. बोरगळवाडी ता. जिंतूर) यांचा लिंबाच्या झाडाखाली मृतदेह असल्याची माहिती रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पोलिसांना दिली. यावरून घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे, बिट जमादार लिला जोगदंड यांनी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

दरम्यान, पोलिसात घटनेची प्राथमिक माहिती मृताचे मामा राम कीशन दगडू घनदारे यांनी दिली. त्यावरून मृत लिंबाजी मेटकर हा काही कामानिमित्ताने जिंतूरला आला असल्याचे समजते. याप्रकरणी जिंतूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.