water supply project for Beed
water supply project for Beed sakal

Beed News : सहाव्या योजनेने तरी 'धारूर' शहराच्या पाण्याचा प्रश मिटणार का..?

Beed News : नव्याने ६५ कोटी रुपयांची पाणी योजना कार्यन्वित; २२ कोटी रुपयांची सुजल पाणी योजना स्थानिक राजकारण्यांमुळे बारगळली.
Published on

किल्लेधारूर : जि.बीड शहरासाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या नगरपरिषदेच्या नवीन पाणीपुरवठा प्रकल्पास नगरोत्थान योजनेंतर्गत ६५ कोटी रुपयांची राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून, याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (ता.०४) रोजी प्रसिद्ध झाला.

मात्र या आगोदर सुद्धा शहरासाठी पाच पाणी योजनेला मंजुरी मिळाली होती मात्र स्थानिक राजकारणी गुत्तेदार व इतर तांत्रिक अडचणीमुळे आजवर धारूर शहर तहानलेले च आहे या योजनेने तरी तहान भागेल का असा सवाल नागरिक करत आहेत.

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आजवर पाच पाणी योजना मंजूर झाल्या तरी देखील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.शहराला सध्या मांजरा धरणावरून पाणी पुरवठा चालू आहे. मात्र या योजनेला मोठा काळ लोटल्याने ही जलवाहिनी जीर्ण झाली आहे,परिणामी नेहमीच पाणी पुरवठा खंडित होऊन नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो आहे.

शहरासाठी २०१४ साली सुजल योजने अंतर्गत २२ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली होती मात्र स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप व गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही पाणी योजना बारगळली, पुन्हा २०२४ साली नगरपरिषद च्या वतीने शहराच्या पश्चिमेस असलेल्या साठवण तलावातून पर्यायी दीड कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केली व काम पूर्णत्वास गेले यामुळे कमी अधिक प्रमाणत शहराची तहान भागात आहे.

 water supply project for Beed
Beed News : गावच्या महसूल प्रमुखपदाची ‘नोकरीही आम्हाला नको रे बाबा’; 6 महिन्यानंतरही २८ तलाठी रुजूच नाहीत

प्रशासक तथा मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी २०२३ साली नव्याने पाणी योजनेचा प्रस्ताव नगरोत्थान ला पाठवला होता या प्रस्तावाला ६५ कोटी रुपयांची शासनाची मंजुरी मिळाली असून (ता.४/२४) रोजी शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे.या नव्याने मंजुरी मिळालेल्या पाणी योजनेमुळे शहराची पुढील अनेक वर्षांची तहान भागणार आहे.या योजनेसाठी आमदार प्रकाश सोळंके यांनी पाठपुरावा केला आहे.मात्र आजवर पाच पाणी योजना बारगळल्या असल्याने ही योजना पूर्ण होईल का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

किल्ले धारुर शहरास कुंडलिका पाणी पुरवठा योजना ही २०१४ मध्ये मंजुर झाली परंतु स्थानिक नगर परिषदेच्या राजकीय कुरघोडीतुन योजना दहा वर्षात वेगवेगळ्या कारणाने पुर्ण होऊ शकली नाही. दहा वर्षांनंतर कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी गायकवाड साहेब यांनी योग्य नियोजन करुन कुंडलिका पाणी पुरवठा योजनेस निधी वाढवून घेतला आहे याचे कौतुकच आहे.

कुंडलिका पाणी पुरवठा योजना पुर्ण व्हावी यासाठी आम्हीही शासन दरबारी निवेदन दिले परंतु शासनाच्या निष्क्रिय अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दहा वर्ष दुर्लक्ष केले. कुंडलिका पाणी पुरवठा योजनेस वाढीव निधी आला त्याप्रमाणे कामही पारदर्शकपणे होणे आवश्यक आहे. शासनाने चांगल्या प्रतिच्या गुत्तेदाराची निवड करुन या योजनेचे काम दर्जेदार होण्यासाठी एक शासकीय व निमशासकीय समितीची नेमणूक करुन काम पुर्ण करुन घ्यावे... प्रा.विजय शिनगारे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com