jayant patil
sakal
बीड - अतिवृष्टी, पूरस्थितीने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ठोस, उदात्त भावनेने मदत करावी, संपूर्ण कर्जमाफी द्यावी. कर्जमाफीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील म्हणाले. ‘यापूर्वी आम्ही संपूर्ण कर्जमाफी केल्याने आता रक्कम कमी लागू शकते, मदतीशिवाय शेतकरी उभा राहू शकणार नाही,’ असे त्यांनी नमूद केले.