Haribhau Bagade and Ajit pawar
sakal
फुलंब्री - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या बुधवारी झालेल्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली जाण्याने एक स्पष्टवक्ता, शब्दाला टिकणारा आणि माणुसकी जपणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे भावूक झाले.
राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की, 'मी २०१४ ते २०१९ या कालावधीत विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. त्या काळात सभागृहात अजितदादांचा वावर नेहमीच थेट, मुद्देसूद आणि प्रामाणिक असायचा. ते कधीही वाईट हेतूने किंवा संकुचित भावनेने टीका करत नसत.'