विद्यूत डीपी फोडून सव्वापाच लाखांची चोरी; वसमत येथील घटना

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी रोडवर जयनगरला लागून व गणेशपूर रोडवर कृषी व पणन मंडळाचे केळी निर्यात सुविधा केंद्र आहे.
वसमतमध्ये याच डीपीतील साहित्याची चोरी
वसमतमध्ये याच डीपीतील साहित्याची चोरी
Updated on

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : येथील परभणी रोडवरील जयनगरला लागून असलेल्या कृषी व पणन मंडळाच्या केळी निर्यात सुविधा केंद्रातील विद्युत डीपी फोडून तांब्याची तार व ऑइल मिळून सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात मंगळवार ( ता. २२ ) रात्री उशिरा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परभणी रोडवर जयनगरला लागून व गणेशपूर रोडवर कृषी व पणन मंडळाचे केळी निर्यात सुविधा केंद्र आहे. या केळी निर्यात सुविधा केंद्रामध्ये शुक्रवारी ( ता. १८ ) च्या रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा भिंतीवरुन आतमध्ये प्रवेश मिळवला. यावेळी चोरट्यांनी आतमध्ये असलेल्या कृषी मालास लक्ष न करता त्यांनी बाजूलाच तार कंपाउंडमध्ये असलेल्या विद्युत डीपीकडे आपला मोर्चा वळवला. सदरील चोरट्यांनी तार कंपाउंड तोडले व डीपी फोडून त्यातील किमती असलेली तांब्याची तार व ऑइल घेऊन पोबारा केला. ज्याची किंमत पाच लाख २३ हजार ३९६ रुपये आहे. चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आल्यानंतर प्रल्हाद बोरगड यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक शिवाजी गरमे करत आहेत.

हेही वाचा - कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले

विद्युत पुरवठा सुरु नसल्याचा चोरट्यांनी घेतला फायदा

कृषी व पणन मंडळाने कोट्यावधी रुपये खर्चून शेतकऱ्यांच्या हितासाठी केळी निर्यात सुविधा केंद्र उभारले. परंतु उभारण्यापासूनच या केंद्राला शहरातून स्वतंत्र वीज पुरवठा नाही. गणेशपुर ग्रामीण फिडरवरुन विद्युत पुरवठा असल्याने या केंद्राला निर्मितीपासूनच विजेच्या भारनियमनाचा फटका बसलेला आहे. नेहमीप्रमाणे चोरी घडली त्या दिवशी रात्रीचे विद्युत भारनियमन सुरु होते. याच भारनियमणाचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com